राजकीय वादळाच्या पार्श्भूमीवर मुंबई पोलीस आयुक्तचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र

राज्यातील परिस्थिती पाहता मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे
Maharashtra Politics Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Meeting with Commissioner of Police and Deputy Commissioners of Police mumbai
Maharashtra Politics Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Meeting with Commissioner of Police and Deputy Commissioners of Police mumbai esakal

मुंबई : राज्यातील परिस्थिती पाहता मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. याच दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शनिवारी मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्त यांची बैठक घेतली. सदर बैठकीत सध्याच्या राजकीय परीस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सुचना दिल्या. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तीसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहीती घेण्याच्या सुचना दिल्या. सध्या चालु असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले. विशेष शाखेने सोशल मिडीयावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले.

कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सुचना दिल्या. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्वांनी सजग राहुन कर्तव्य करणे अपेक्षित आहे या सुचना आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना देण्याबाबत सांगण्यात आले. मुंबई शहरात कन्नम १४४ मी. आरपीसी हे प्रतिबंधात्मक आदेश पाळले जातील याबाबत सुचना देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com