महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक जाहीर झाले आहे. 8 जुलैला "टीईटी'ची परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेतर्फे टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी 25 एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. परीक्षा मंडळे, विनाअनुदानित आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना www.mahatet.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल. या परीक्षेसाठी हॉल तिकीट 25 जून ते 7 जुलैदरम्यान मिळणार आहे. 8 जुलैला सकाळी 10.30 वाजता पहिला पेपर सुरू होईल, तर दुसरा पेपर दुपारी 2 वाजता आहे.
Web Title: maharashtra teacher Eligibility exam time table declare