महावितरणची "अभय' योजना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

मुंबई - बिले न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांचे थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार दोन्ही माफ करण्यात येणार आहे. महावितरणच्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे 97 हजार 464 ग्राहकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. 

ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा 31 डिसेंबर 2017 पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना 100 टक्के व्याज व विलंब आकारण्यातून सवलत मिळणार आहे. 1 जुलै 2018 ते 31 ऑगस्ट 2018 या दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकी आणि व्याजाची 25 टक्के रक्कम भरली तर उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची माफी मिळेल. 

न्यायालयीन प्रकरणातील ग्राहकांनाही लाभ 
जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षांपेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी ते एकाच वेळी भरल्यास त्या ग्राहकालाही 100 टक्के व्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षांपर्यंतचे आहे आणि न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे, अशा ग्राहकांनी एका टप्प्यात त्याचा भरणा केल्यास त्यांना 50 टक्के व्याजमाफीची सूट देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

Web Title: Mahavitaran announced an Abhay scheme