रेल्वेखाली उडी घेऊनही 'तो' सुखरूप!

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई : आजाराला कंटाळून एकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला काहीही न होता तो सुखरुप बचावला. विक्रोळी स्थानकावर घडलेली ही आश्चर्यजनक घटना चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिनकर कोंडीबा संकपाळ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आजाराला कंटाळून संकपाळ यांनी मागील आठवड्यात विक्रोळी स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकलचा काही भाग अंगावरून जाऊनदेखील त्यांना काहीच झाले नाही. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभवच त्यांनी घेतला. 

कोणीतरी लोकलसमोर उडी घेऊन झोपले असल्याचे दिसताच चालकाने ब्रेक मारला. तोपर्यंत लोकलचा काही भाग सकपाळ यांच्या वरून जाऊनदेखील ते सुखरूप होते. यावेळी रेल्वे पोलिस दलाचे अखिलेश सिंग यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सकपाळांना बाहेर काढले. यानंतर त्यांना घाटकोपर चौकीत आणून रेल्वे पोलिस दलाचे उपनिरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी समुदेशन करून संकपाळ यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

व्हिडीओ गॅलरी