ओला कॅबचा प्रवास पडला 149 कोटीला !

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई- सुशील नरसिआन यांनी प्रवास करण्यासाठी ओला कॅब बुक केली. मोटारीने तिनशे मीटर अंतर पार करून घटनास्थळी पोचविले देखील. पण, या प्रवासाचे भाडे आले तब्बल 149 कोटी. याबाबतची माहिती नरसिआन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

नरसिआन यांनी 1 एप्रिल रोजी प्रवास करण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. मोटारीमधून खाली उतरल्यानंतर प्रवासाचे बिल चुकते करण्यासाठी कार्डचा वापर केला. कार्डवरून 127 रुपयांची कपात झाली. परंतु, खात्यावरून 1491045368 रुपये कपात झाल्याचे दिसले. यामुळे नरसिआन यांना एक एप्रिल रोजी 'एप्रिल फूल'चा धक्काच बसला.

कॅब कंपनीने प्रवासाच्या भाड्यापोटी 127 रुपयांची कपात केली आहे. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे 1491045368 ही रक्कम पडली. दोन तासातच ही अडचण दूर करण्यात आली, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Man takes Ola cab, gets bill of Rs 149 crore

टॅग्स