मांडूळ विकणाऱ्या तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - मांडूळ जातीचा दुर्मिळ साप बाळगल्याबद्दल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विपुल राजाराम जोशी या तरुणाला अटक केली. एप्रिलमध्ये भायखळा येथे एकाला याच कारणावरून अटक करण्यात आली होती.

मुंबई - मांडूळ जातीचा दुर्मिळ साप बाळगल्याबद्दल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विपुल राजाराम जोशी या तरुणाला अटक केली. एप्रिलमध्ये भायखळा येथे एकाला याच कारणावरून अटक करण्यात आली होती.

त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन तोंडाचा साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची पूजा केल्यास तो गुप्त धनाचा शोध लावून देतो, अशी अंधश्रद्धा आहे. औषध निर्मितीसाठीही या सापाचा वापर केला जातो. त्यामुळे मुंबईतही त्याला मोठी मागणी आहे. जप्त केलेल्या या सापाला नवी मुंबईतील वन्य जीव नियंत्रण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 25 लाखांपासून एक कोटीपर्यंत या सापाची विक्री केली जाते.