मंत्रालयापुढे 'खड्डे खोदो' आंदोलन

MNS
MNS

मुंबई - पावसात चाळण झालेल्या मुंबईतील रस्त्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 17) रात्री मंत्रालयासमोरील रस्ता व पदपथ खोदून आंदोलन केले. यापैकी आठ कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

मल्टिप्लेक्‍समधील महागड्या खाद्यपदार्थांविरोधात पुण्यात आक्रमक आंदोलन केल्यानंतर मनसेने खड्ड्यांच्या समस्येकडे मोर्चा वळवला आहे. सोमवारी रात्री मनसेचे 20 हून अधिक कार्यकर्ते दुचाकी व कारमधून मंत्रालयासमोर उतरले. त्यांच्या हाती फावडे, कुदळ होती. मंत्रालयातील गस्तीवरील पोलिस त्यांच्याजवळ येण्यापूर्वीच आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रस्ता खोदण्यास सुरुवात केली. ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिस तिकडे रवाना झाले.

पोलिसांची गाडी दिसताच काही कार्यकर्त्यांनी पळ काढला. आठ जणांना पोलिसांनी पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com