मुंबईत ठिय्या

मुंबईत ठिय्या

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा तत्काळ करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी परळ, चेंबूर, गोरेगाव, कामोठे, बोईसर, ठाणे आदी विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. परळ येथील भारतमाता चित्रपटगृहाजवळच्या फूटपाथवर सुमारे २०० कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या घालून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. यामध्ये तरुणांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. लाखोंचे मोर्चे काढूनही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच मराठ्यांना रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करावे लागत आहे. हे आंदोलन शांतपणे सुरू असले तरी सरकारने मराठ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशाराही आंदोलकांनी दिला. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मेगाभरती जाहीर करू नये. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असली, तरी ते घटनेनुसार नाही. ही प्रक्रिया रद्द होऊ शकते. त्यामुळे सरकारने नवीन भरती करू नये, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. शिवरायांच्या भव्य पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला तर येणाऱ्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा सरकारची उंची कमी करील, असा इशाराही या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com