अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेसह भाजपही रिंगणात

Marathi news Ambarnath councilor election Shivsena BJP
Marathi news Ambarnath councilor election Shivsena BJP

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवसेनेबरोबर भाजपनेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी (ता.21) निवडणूक होणार आहे.

अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 26, तर भाजपचे 10 नगरसेवक आहेत. शिवसेनेने गुरुवारी (ता.16) नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज घेतले. त्यापाठोपाठ भाजपने आज शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. गेल्या वर्षी एका तडजोड प्रकरणात शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आणि भाजपला बांधकाम समिती सभापतिपद देण्यात आले. दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आणि खबरदारी म्हणून शिवसेनेचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. उद्या (ता.18) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com