भिवंडी-वाडा रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

वाडा - भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी-वाडा महमामार्गावर नेहरोलीजवळ गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.

वाडा तालुक्‍यातील कोनसई येथील वसंत मेघवाले (वय 25) व संजय कुऱ्हाडे (वय 28) हे दोन तरुण दुचाकीवरून निघाले होते. एमएच 04 एसएस 1206 क्रमांकाच्या पल्सर गाडीने हे दोघे गुरुवारी रात्री एका मित्राला निरोप देण्यासाठी गेले होते. मित्राला सोडून परतत असताना नेहरोली गावाजवळ भरधाव वेगात असलेली त्यांची दुचाकी अचानक स्लीप झाले. यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात दोघांच्या डोक्‍याला व हात-पायाला जबर मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. संजयला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ग्रामीण रुग्णालयातील उपचारादरम्यान वसंतचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोनसई गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात वाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.