जगातला मोठा मेंदू ट्युमर मुंबईतील रुग्णालयात काढला 

Brain Tumor operation at Nair Hospital Mumbai
Brain Tumor operation at Nair Hospital Mumbai

मुंबई : डोके दुखी आणि अधू झालेली दृष्टी तसंच डोक्यावर डोक्यापेक्षा मोठ्या आकार तयार झाल्याने संतलाला पाल याला जगणं मुश्किल झालं होतं. 1 किलो 873 ग्रॅमचा ट्युमर असलेल्या संतालालवर मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग 7 तास शस्त्रक्रिया करुन जगातला सर्वात मोठा ट्युमर बाहेर काढला आहे. 

31 वर्षांचा संतालाल पाल हा उत्तरप्रदेशातील कापड विक्रेता. गेलल्या अनेक वर्षांपासून त्याला सतत होणाऱ्या डोकेदुखीवर ईलाज सापडला नव्हता. त्यानंतर त्याच्या डोक्यावर वाढत चाललेला आकार आणि दृष्टी कमी होणे या त्रासामुळे त्याच्यावर लवकरात लवकर ईलाज होणे गरजेचे आहे असे तेथील डॉक्टरांना वाटत होते. मात्र, त्यावर काय उपचार करावे आणि कोणी करावे याबाबत मात्र कोणी पुढाकार घेत नव्हते. तेव्हा संतालाल आणि त्याच्या कुटूंबियांनी मुंबई गाठली. नायर रुग्णालयात संतालालवर उपचार सुरू झाले. सीटी स्कॅन, मेंदूचा एमआरआय स्कॅन आणि ट्युमरचा रक्तपुरवठा समजून घेण्यासाठी ट्युमरची एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये संतालालच्या कवटीच्या हाडांव्दारे मेंदूच्या दन्ही बाजूंना 30x30x20 से.मी. गाठ पसरल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. या गाठीमुळे डोक्यावर डोक्याएवढा आकार तयार झाला होता. ज्याने संतालालला जडपणा आला होता आणि त्याची दृष्टी अधू झाली होती. 

नायर रुग्णालयातील न्युरोसर्जन डॉक्टर त्रिमुर्ती नाडकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर 1 किलो. 873 ग्रॅम वजनाचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. पेरिऑपरेटीव्ह मॉनिटरींगमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. 

डॉ. नाडकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रक्रिया अजिबात सोपी नव्हती. वर्षभरापासून हा ट्युमर वाढत होता. मेंदूमध्ये ट्युमरचा काही भाग घुसला होता. तर काही ट्युमरचा काही भाग कवटीतून बाहेर आला होता. रक्तवाहिन्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या होत्या म्हणूनत उत्तर प्रदेशातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. डॉ. त्रिमुर्ती यांच्या नेतृत्त्वाखाली 6 डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर संतालालला 11 युनिट रक्त चढवावं लागलं. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे 4 लाख आणि त्यापेक्षा अधिक असला असता. मात्र, नायर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. 

दृष्टी पूर्ववत होईल पण...
ब्रेन ट्युमरमुळे अधू झालेली दृष्टी पूर्ववत होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी काही वेळ जावा लागणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले. 

डॉक्टरांनी मोडला स्वतःचा विक्रम 
डॉ. नाडकर्णी यांनी 2002 साली 1 किलो 400 ग्रॅम वजनाचा ट्युमर काढला होता. जो सर्वात मोठा ट्युमर असल्याची नोंद करण्यात आली होती. 16 वर्षांनंतर संतालालच्या डोक्यातून डॉ. नाडकर्णी यांनी काढलेला 1 किलो. 873 ग्रॅम वजनाचा ट्युमर काढून त्यांनी स्वतःचा विक्रम मोडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com