कल्याण पूर्वमधील दूषित पाणी समस्या दूर

Kalyan
Kalyan

कल्याण : कल्याण पूर्वमधील गणेश वाडी परिसरातील दूषित आणि किडे मिश्रित पाणी पुरवठा प्रकरणात तोडगा काढण्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाला आज यश आले असून तेथील पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. यावेळी पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते कोकण भवन येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

मागील आठवड्यात कल्याण पूर्व मधील गणेश वाडी सहित अन्य भागात दूषित आणि किडे, आळ्यामिश्रित पाणी पुरवठा झाल्याने नागरीकांत भितीचे वातावरण होते. तक्रारीची दखल घेत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक घोडे यांच्या पथकाने दूषित पाणी का येते याची शोध मोहीम सुरू केली. 

मंगळवार (ता. 12) डिसेंबर रोजी गणेशवाडी येथील एका शाळेजवळील गटार मधील घाणेरडे पाणी आणि किडेमिश्रित पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मधून नागरीकांना जात असल्याचे समोर आले. यावर त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले यावेळी अनेक पाईपलाईन साफ करण्यात आली. 

त्यानंतर आज बुधवार (ता. 13) डिसेंबर रोजी पाणी पुरवठा विभाग उपअभियंता अशोक घोडे आणि पालिकेच्या डॉक्टरांच्या पथकाने त्या परीसरात भेटी देत पाण्याचे नमुने गोळा केले असून कोकण भवन येथील लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. एक आठवड्यानंतर त्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत असताना शुद्ध पाणी आल्याने त्या परिसरातील सुटकेचा श्वास सोडला आहे. 

कल्याण पूर्व गणेशवाडी परिसरातील दूषित आणि किडे मिश्रित पाणी समस्या दूर झाली असून आज पाणी पुरवठा सुरळीत झाला असून आज आम्ही पाण्याचे नमुने गोळा केले असून तपासणीसाठी कोकण भवन येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील उपाययोजना केली जाईल अशी माहिती पाणी पुरवठा विभाग उपअभियंता अशोक घोडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com