खोट्या कागदपत्राद्वारे मुंबईतील विकसकाची 45 कोटींची फसवणूक 

खोट्या कागदपत्राद्वारे मुंबईतील विकसकाची 45 कोटींची फसवणूक 

कल्याण - बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर सुरू असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रकल्पाची खोटी कागदपत्रे तयार करून 45 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील विकसक संजय व्यास यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अनिल शहा असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्याला सुभाष सिंग ठाकूर याच्याकडून धमकी दिल्याचेही व्यास यांनी तक्रारीत म्हटले आहे. पालिकेचे अनेक प्रकल्प रखडलेले असताना अशा प्रकारे ठेकेदाराने केलेल्या फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

2009 मध्ये पालिकेने मेसर्स एसएम असोसिएटस्‌ बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स यांच्यासमवेत दुर्गामाता चौकातील या प्रकल्पासाठी करार केला होता. संजय व्यास यांना या कंपनीतील एक भागीदार मॅथ्यूज कुंचिन तसेच अनिल आणि सीमा शहा यांनी खोटा करारनामा दाखवत फसवले आहे. 

2014 पासून व्यास शहा यांना पैसे देत आहेत. वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत शहा यांनी व्यास यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. मॅथ्यूज यांच्या मेलद्वारे आलेल्या नोटिशीमुळे हा प्रकार व्यास यांना समजला. त्यानंतर व्यास यांनी शहा यांच्याकडे पैशांचा तगादा लावला. शहा यांनी व्यास यांना आपल्या कार्यालयात बोलावून सुभाष सिंग ठाकूर याच्याकडून धमकी दिल्याचेही व्यास यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com