दमणगंगा नदीजोड प्रकल्पाला नागरिकांचा विरोध

भगवान खैरनार
बुधवार, 13 डिसेंबर 2017

मोखाडा : केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या विविध भागातल्या नदी जोड प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पात बाधीत शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाला विरोध केला आहे. हा नदीजोड प्रकल्प जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरानगरहवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील कारगिल हिल टेकडीजवळ केला जाणार आहे. केंद्र शासनाने नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हा होणारा नदीजोड प्रकल्प मोडीत काढण्यासाठी जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता.

मोखाडा : केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या विविध भागातल्या नदी जोड प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पात बाधीत शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाला विरोध केला आहे. हा नदीजोड प्रकल्प जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरानगरहवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील कारगिल हिल टेकडीजवळ केला जाणार आहे. केंद्र शासनाने नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हा होणारा नदीजोड प्रकल्प मोडीत काढण्यासाठी जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता. १२) शेतकऱ्यांनी व नागरिकांनी प्रकल्प मोडीत काढण्यासाठी हजारोंच्या संख्यने उपस्थित राहून या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. 

गुजरात, दादरानगरहवेली या राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर जिल्हयातील जव्हार मधील वावर वांगणी येथे होणा-या नदीजोड प्रकल्पाच्या कामासाठी हालचाली होऊ लागल्या असून केंद्र शासनाचे अधिकारी रोज येऊन या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यामुळे या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी वावर वांगणी येथे मंगळवारी (ता. 12) मोर्च्याचे आयोजन करून भव्य सभा घेतली आहे. या प्रकल्पामुळे  परिसरातील हजारो शेतकरी आणि नागरीवस्ती विस्थापित होणार आहे. त्यामुळे  येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काडाडून विरोध दर्शविला आहे. नदीजोड दमणगंगा प्रकल्प हा नारपार नदी,  वाघ नदी, लेंडी नदी, दमण गंगा अशा नद्या जोडून केला जाणार आहे. या नदीजोड प्रकल्पाचे प्रस्तावित काम आता शासनाकडून चालू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हा नदीजोड प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार येथील  शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून, सध्या सर्वेक्षणाचे काम करत असतांना स्थानिकांना विश्वासात न घेता केले जाते आहे.

पेसा कायदा लागू असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वावर वांगणी या नदीजोड प्रकल्पाअंतर्गत २५ हजार कुटुंबे विस्थापित होणार असून, या प्रकल्पात जव्हार, मोखाडा, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील गाव, पाडे या प्रकल्पामुळे उध्वस्त होणार आहेत. तसेच चार लाख लोकांचे पुनर्वसन आणि जगण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सभा घेत विरोध दर्शविला आहे. नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी माकपा केंद्रीय कमिटी अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि पालघर जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले. तसेच प. स. सदस्य लक्ष्मण जाधव, यशवंत घाटाळ, सरपंच, ताराबाई शिंदे, उपसरपंच यशवंत बुधर  परिसरातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Marathi news damanganga river joint oppposed by citizens