मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा

pujan
pujan

मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर मुंबईतील वर्षा या सरकारी निवासस्थानी त्यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली.

दरम्यान, फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे असं साकडं फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं.

मुख्यमंत्र्यांनी या पुजेचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहे. 'आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही, पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले', असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com