दिग्दर्शक रेमो डिसोझाला गॅंगस्टर रवी पुजारीची धमकी 

अनिश पाटील
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझाला एका चित्रपटाच्या वादातून गॅंगस्टर रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकी आल्याचा प्रकार घडला आहे. फायनान्सर सत्येंद्र त्यागी (वय 36) याच्या सांगण्यावरून रवी पुजारीने हा दूरध्वनी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यागीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी (ता. 6) अटक केली आहे; पण या प्रकरणामुळे बॉलीवूड व अंडरवर्ल्ड या दोघांमधील "कनेक्‍शन' पुन्हा समोर आले आहे. 

याबाबत वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, एका चित्रपटाच्या वादातून हा प्रकार झाला आहे. हा चित्रपट रेमो डिसोझा व त्यागी एकत्र येऊन डेथ ऑफ अमर बनवत होते. राजीव खंडेलवाल या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावत होता. या चित्रपटाचे काम या दोघांच्या वादातून अडकले. चित्रपटासाठी त्यागीने पाच कोटी रुपये गुंतवले होते; पण डिसोझाकडून त्याबाबत "ना हरकत' प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दोघांमध्ये व्यावसायिक वाद सुरू झाला. 

...पाच कोटी अन्‌ 50 लाख 
या पैशाच्या वादातून अखेर गॅंगस्टर रवी पुजारीने डिसोझाला धमकी देऊन ही रक्कम त्यागीला परत करण्यास सांगितले. या प्रकरणात दोघांनीही एकमेकांवर फसवणुकीचे आरोप केले होते. दरम्यान, याप्रकरणी गॅंगस्टर रवी पुजारीने दूरध्वनी करून, त्यागीला पाच कोटी रुपये परत करण्याची धमकी दिली होती. तसेच त्यागीला ना हरकत प्रमाणपत्र दे आणि मला 50 लाख रुपये दे, अशी मागणीही पुजारीने या वेळी केली होती. 

रेमोने टाळण्यास सुरुवात केल्यानंतर रेमोची पत्नी लिझेल डिसोझा हिलाही धमकीचे दूरध्वनी आले. अखेर तिच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम 385, 387 व 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर याप्रकरणी आज गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सत्येंद्र त्यागीला अटक केली. ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत हे धमकीचे दूरध्वनी आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: marathi news Director Remo DSouza crime