होळी सणावर महागाई चा रंग

Holi Festival
Holi Festival

मोखाडा- आदिवासींचा सर्वात मोठा सणं होळी आहे. हा सणं साजरा करण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित झालेला आदिवासी आपल्या घराकडे परततो. या वर्षी गतसालच्या तुलनेत, होळीचा सणं साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. किरकोळ बाजारात खोबऱ्याने दोनशेचा आकडा गाठला आहे. होळी सणाला नारळ, खोबरे, गुळ, साखर, रवा, मैदा यांसह साखरेच्या पाकापासून बनविलेले हारडे आदिवासी खरेदी करतात. मात्र, गतसालच्या तुलनेत खोबरे महागल्याने होळीच्या सणावर, महागाई चा रंग पडला आहे. गतसाली किरकोळ बाजारात खोबरे   110  ते  120  रूपये किलो दराने ऊपलब्ध होते. मात्र, या वर्षी खोबरे  200  रूपये दराने विक्री केले जात आहे. तर साखरेच्या पाकापासुन बनविलेले हारड्यांनी शंभरी ओलांडली आहे. त्याचप्रमाणे नारळ ही पंचवीस रूपयांना झाला आहे. गतसालापेक्षा नारळ पाच ते सात रुपयांनी महागला असल्याचे व्यापारी आणि ग्राहक सांगताहेत. तर ईतर वस्तू मागील वर्षाच्या भावाप्रमाणेच आहेत. त्यामुळे होळीचा नैवेद्य महागला आहे.

या वस्तू महागल्याने त्याचा बाजारपेठेत ही परिणाम दिसू लागला आहे. खोबरे, नारळ, आणि हारडे यांच्या विक्रीत घट झाली आहे. केवळ नैवेद्यापुरतेच या वस्तू ग्राहक खरेदी करत आहेत. या वस्तू महागल्याने, होळी सणावर महागाईचा रंग पडल्याचे बाजारपेठेत जाणवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com