जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Jawhar voting
Jawhar voting

मोखाडा : जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, जव्हार प्रतिष्ठान व भाजप युतीकडून भरत पाटील, शिवसेनेकडून चंद्रकांत (भिकुशेठ)पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्ष संदीप वैद्य तर काँग्रेसकडून धनंजय खेडेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 17 जागांसाठी जव्हार प्रतिष्ठान व भाजप युती, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले असून काँग्रेसने 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अधिकच रंगत आली आहे. 

ऐतिहासिक परंपरा असलेल्या जव्हार नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 13 डिसेंबरला होणार आहे. नगरपरिषद स्थापन होऊन 100  वर्ष पूर्ण झाले आहेत. यंदा नगरपरिषदेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यातच नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. या निवडणूकीसाठी जव्हार प्रतिष्ठान व भाजप युतीने पहिल्यांदाच आव्हान उभे करून रंगत वाढवली आहे. यावेळी पहील्यांदाच थेट मतदारांकडून नगराध्यक्ष निवडून दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com