हेल्मेट घाला नाही तर डोके नसलेल्या मनुष्यासारखी अवस्था होईल

Helmet-Awareness
Helmet-Awareness

कल्याण : दुचाकी चालविताना वाहन चालकाने हेल्मेट घातले पाहीजे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत अन्यथा कारवाई करू अशा सूचना नेहमीच वाहतूक पोलीस देत असतात आणि नियमाचे पालन न करणाऱ्यावर कारवाई ही करतात मात्र तरीही नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई न करता त्यांना भेटवस्तू देत गांधीगिरी स्टाईलने कारवाई केली. 

ठाणे पोलिस आयुक्तालय मधील कल्याण डोंबिवलीसहित भिंवडी, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक ठिकाणी अपघात ही वाढले असून यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या संकल्पनेमधून सध्या विविध शहरात एक अभिनव उपक्रम वाहतूक पोलिसांनी हाती घेतला आहे. दुचाकी चालविताना वाहतुकीचे नियम पाळले नाही, हेल्मेट न घातल्यास  डोके नसलेल्या माणसासारखी अवस्था होऊ शकते असे प्रबोधन करत आहेत.

आज (ता. 22) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे यांच्या पथकाने पोलीस मित्रा समवेत डोंबिवली मधील विविध ठिकाणी दुचाकी वाहन चालकावर कारवाई न करता हेल्मेट घाला, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे याबाबत प्रबोधन केले यावेळी त्यांना कीचेन भेट वस्तू देत, गांधीगिरी स्टाईलने अभिनव उपक्रम राबविला, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

शहरात विविध ठिकाणी वाहतुकीचे नियम न पाळल्यास वाहतुक पोलीस कारवाई करतात, मात्र त्यांचे प्रबोधन करा मग त्यांच्यावर कारवाई करा यासाठी  पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या संकल्पनेमधून डोके नसलेला माणूस  (हेडलेस मॅन) उपक्रम सध्या आम्ही हाती घेतला असून चारशेहून अधिक वाहन चालकांचे आज प्रबोधन करण्यात आले अशी माहिती डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोंविद गँभिरे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com