कल्याण पूर्वमध्ये भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद 

Kalyan-rasta-roko
Kalyan-rasta-roko

कल्याण : कोरेगाव-भीमा मधील घटनेचे पडसाद कल्याण पूर्व मध्ये उमटले, भिमसैनिकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको, रॅली, घोषणाबाजी देत घटनेचा निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते यामुळे कल्याण पूर्व मधील अनेक भागात दुकानदारांनी दुकाने बंद केल्याने अनेक भागात शुकशुकाट होता. 

कोरेगाव-भीमात सोमवारी (ता. 1) झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याण पूर्व मध्ये अनेक भागात भिमसैनिकांनी रस्त्यावर उतरत मोर्चा, रॅली काढला होता तर नेतवली पत्रीपुलाजवळ रास्ता रोको करत आरोपींना अटक करत कालच्या घटनेचा निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 

यामुळे श्रीराम टॉकीज, काटेमानवली नाका, पूनालिंक रोड, गणपती चौक ते काटेमानवली नाका, कर्पेवाडी, सिद्धार्थ नगर, म्हसोबा चौक, तिसगाव नाका आदी परिसरातील दुकाने कडकडीत बंद होती तर काही प्रमाणात रिक्षा सुरू होत्या त्याही भिमसैनिकांनी बंद करण्याच्या विनंतीमुळे काही भागात बंद होत्या यामुळे कल्याण पूर्व मधील अनेक भागात तणावपूर्ण शांतता होती. तर अनेक भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. तर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कोळशेवाडी पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com