कल्याणमध्ये कोकण महोत्सवाला सुरवात

Kalyan
Kalyan

कल्याण : कोकणी माणूस नारळाप्रमाणे गोड असतो, तो कितीही गरीब असला तरी हताश होत नाही, प्रत्येक संकटाला सामोरे जात असतो, आज कल्याण पूर्वमध्ये कोकण महोत्सव सुरू झाला आहे तो पुढेही सुरू ठेवा असे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात केले.

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान वतीने कल्याण पूर्व मधील पोटे मैदान मध्ये 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2018 या कालावधीत पहिला कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला असून रविवार (ता. 18) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

सायंकाळी कल्याण पूर्व मधील तिसाई देवी मंदिर पासून पालखी काढण्यात आली, तर पोटे मैदानात मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला, यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या भाषणात कोकणात कल्याण, ठाणे आणि मुंबई ही मोडत असून तेथील माणसे गोड असल्याचे सांगत जेव्हा आमदार गायकवाड कोकणात व्यवसाय करत असताना खूप मदत केल्याचे सांगत भविष्यात असे कार्यक्रम झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि काँग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांचे भाषण ही झाले. यावेळीअध्यक्ष संजय मोरे, सुभाष म्हस्के, संदीप तांबे, प्रथमेश सांवत, राजाराम पावशे आदी मान्यवर उपस्थित होते . 

कल्याण पूर्व मधील पोटे मैदानात आठ दिवस चालणाऱ्या बच्चे कंपनीला खेळण्यासाठी विविध विविध पाळणे आणि अन्य वस्तू ठेवण्यात आली असून मनोरंजन कार्यक्रम, कोकणातील खाद्य पदार्थ विक्रीसाठी विविध स्टॉल, उभरण्यात आले असून नागरीकांनी प्रत्येक दिवशी हजेरी लावून कोकण महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन  कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान अध्यक्ष संजय बाबुराव मोरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com