कल्याण - कामाचा प्रस्ताव सादर करावा, निधी मिळवून देऊ

KDMT
KDMT

कल्याण : केडीएमटीच्या डोंबिवली मधील खंबाळपाडा डेपो मधील पहिल्या टप्यातील काम 15 मार्च पूर्वी होईल मात्र केडीएमटीला आवश्यक असलेल्या कामाचा प्रस्ताव बनवून आयुक्तांना सादर करावा त्याला निधी मिळवून देऊ असे आश्वासन केडीएमटी समिती सदस्यांना महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आज दिले.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या कल्याण आणि डोंबिवली मधील डेपो विकसित करण्याचे काम केडीएमटी प्रशासन ऐवजी पालिका करत असून डोंबिवली मधील खंबाळपाडा डेपोचे काम धिम्या गतीने सुरू असल्याची तक्रार केडीएमटी सभापती संजय पावशे आणि सदस्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली असता आज (ता. 23) महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात महापौरांसमवेत सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, उपायुक्त सुरेश पवार, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, परिवहन समिती सभापती संजय पावशे, सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, सुभाष म्हस्के, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव,  प्रसाद माळी, कल्पेश जोशी, संजय राणे आदींनी सहभाग घेतला.

यावेळी केडीएमटीच्या रखडलेल्या विविध कामाचे आढावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घेतला. तद्नंतर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले की, केडीएमटीने काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने केडीएमटीचे डेपो विकसित करण्याचे काम हाती घेतले होते ते अंतिम टप्यात आहे. खंबाळपाडा येतील डेपो मधील काम 15 मार्च पूर्वी पूर्ण होईल मात्र केडीएमटीला तेथे आवश्यक असलेली कामाचे प्रस्ताव बनवून आयुक्ताकडे सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. आगामी बजेट मध्ये जास्तीत जास्त निधी तरतूद करून ते देण्याचा प्रयत्न करू, ठेकेदारामार्फत नोकर भरती करण्याऐवजी कंत्राटी पध्द्तीने ती भरती करा, शासन दरबारी ज्या मंजुरी रखडल्या आहेत त्या खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मार्गी लावू, आदी विषयावर चर्चा आणि आश्वासन दिल्याचे महापौर देवळेकर यांनी माहिती दिली. गरज असल्यावर पाठपुरावा करण्याऐवजी वेळोवेळी पालिका पदाधिकारी वर्गाला केडीएमटीमधील कामकाज माहिती करून दिल्यास पालिका आयुक्त आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्यास सोपे जाईल अशा सूचना महापौर देवळेकर यांनी केडीएमटी सदस्यांना दिल्या.

उद्घाटन पुढे जाण्याची शक्यता
खंबाळपाडा केडीएमटी डेपो मधील विविध काम अपूर्ण असल्याने 20 मार्च रोजी उदघाटन करण्याऐवजी परिपूर्ण डेपो झाल्यावर उद्घाटन सोहळा करण्याच्या सूचना महापौर राजेंद्र  देवळेकर यांनी दिल्याने उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com