कल्याण - रेल्वे समस्या दूर करण्याची प्रवासी संघटनेची मागणी

Kalyan
Kalyan

कल्याण : कल्याण आणि उल्हासनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छोट्या मात्र महत्वाच्या मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात विविध समस्यांने ग्रासले असून त्या समस्या दूर करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

कल्याण आणि उल्हासनगर या दोन शहरात नव्याने वसलेल्या लोकवस्तीसाठी मध्यवर्ती असलेल्या मध्य रेल्वेचे शहाड रेल्वे स्थानक महत्वाचे आहे. प्रति दिन येथून सरासरी 80 ते 90 हजार प्रवासी प्रवास करतात, यातून महिन्याला सव्वा कोटी उपन्न रेल्वेला मिळते. दोन फलाट, फेरीवाल्यांचा विळखा, पादचारी पुलावरील बत्ती गुल, दारुडे आणि गर्दुल्ले यांचा वावर, चोऱ्या, पादचारी पूल असताना रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणे, शौचालय आहे मात्र घाणीचे साम्राज्य, तक्रारी फार मात्र सुरक्षेसाठी एकच आरपीएफ आणि जीआरपीचे जवान, दुपार नंतर कुठलीही घोषणा होत नसल्याने प्रवाश्याना प्रवास करण्यास अडचण आदी अनेक समस्या आणि तक्रारी रेल्वे प्रवासी संघटनाकडे आल्याने, आज शनिवारी (ता. 24) कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी राजेश घनघाव, श्याम उबाळे, चंद्रकांत जाधव, अन्वर मणियार, विवेकानंद कानेटकर, संतोष जगताप, आशा डिसुझा, कांचन कुलकर्णी, अनंता ढोणे, अनिल त्रिपाठी  आणि स्टेशन मास्तर पिंटो आदींनी शहाड रेल्वे स्थानकात जाऊन पाहणी केली.

मागण्या
पादचारी पुलावर जाळ्यासहित विद्युत पुरवठा सुरू करून पथदिवे लावावे, फेरीवाल्यावर कारवाई करावी, रेल्वे रूळ आणि सरंक्षक भिंतीवरून उड्या मारून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी, उद्घोषणा आणि इंडिकेटर सुरू करावे, स्टेशन परिसरात स्वच्छता ठेवा, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल जवानांची संख्या वाढवावी, पादचारी पुलावर दारू पिणारे, छेडछाड करणाऱ्यावर कारवाई, अनधिकृत पार्कींगवर कारवाई आदी मागण्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाकडे केली असून त्यावर रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करते याकडे लक्ष लागले आहे .
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com