कल्याण - रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण होणार कधी? 

kalyan
kalyan

कल्याण : कल्याण पूर्व मधील पूनालिंक रोड वरील तिसगांव नाक्यावर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी अनेक दिवसांपासून पालिकेने खोदून ठेवला असून धोकादायक खड्डयामुळे वाहनचालकासहीत नागरीक त्रस्त असून सुरक्षेचा कुठलाही उपाययोजना न केल्याने नागरीक संताप व्यक्त करत असून त्या परिसरात पिण्याच्या पाईप लाईन फुटल्याने त्या बदलण्याचे काम सुरू असल्याने त्या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरीक त्रस्त आहेत.

स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या विविध प्रकल्प रखडलेल्याने नागरीकांना मूलभूत सुविधा देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्यावधी रुपये निधी मधून कल्याण पूर्व मधील पूनालिंक रोड वरील चक्कीनाका ते श्रीराम टॉकीज परिसरात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम धिम्या गतीने अनेक वर्षापासून काम सुरू असल्याने वाहनचालका सहित नागरीकांना त्रास होत आहे . 

तिसगाव नाक्यावर वर सिमेंटचा रस्ता करण्यासाठी पालिकेने बुधवार 14 फेब्रुवारी रोजी रस्ता खोदला मात्र रस्त्यात पिण्याच्या पाणीच्या पाईप लाईन आल्याने काम करण्यास अडथळा निर्माण झाला, यातच तेथे काम करताना पाईप लाईन फुटल्याने त्या परिसरात अनेक इमारतींना पाण्याची समस्यां निर्माण झाल्याने नागरीकांत संतापाचे वातावरण आहे. सध्या पाईप लाईन बदलण्याचे काम सुरू राहिल्याने त्या परिसरात वाहतूक कोंडी होत असून कुठल्याही सूचना, बोर्ड, नसल्याने नेमकी कोण काम करणार याबाबत नागरीकांत संभ्रम निर्माण झाला आहे . 

नियम धाब्यावर
पालिका हद्दीत कुठलाही प्रकल्प राबविताना तेथे बोर्ड लावणे अपेक्षित असून कधी काम सुरू झाले, निधी कुणाचा, कधी संपणार, ठेकेदार कंपनी नाव, त्या परिसरात पालिका अधिकारी कोण याबाबत बोर्ड लावणे अपेक्षित असून त्या परिसरात वाहतूक कोंडी होत असेल तर वाहतूक पोलिसांना सूचना देऊन तेथे अधिकारी कर्मचारी वर्गाची नेमणूक करून नागरिक आणि वाहन चालकांना मदत होईल याची काळजी घ्यायला आवश्यक आहे मात्र कुठलेही सुरक्षेची काळजी न घेतल्याने मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागी होणार काय असा सवाल केला जात आहे.

धोकादायक खड्डा 
तिसगाव नाक्यावर रस्त्याच्या कामामुळे भला मोठा खड्डा निर्माण झाला असून पाईप लाईन मधील पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून चेंबरला होल पाडले असल्याने सकाळी 5 ते 7 या कालावधीत त्या खड्डा जलमय असतो तर अनेक दिवसापासून काम सुरू असल्याने पाणी समस्यां आणि वाहतूक कोंडीने तेथील व्यापारी, नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत .

सिमेंट रस्ते बनविण्याचे काम करताना त्या परिसरात पाईप लाईन असून त्या हलविण्याचे काम सुरू असून ते पूर्ण होताच रस्त्याचे काम पूर्ण होईल, त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिका सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी केले आहे. 

रस्ता व्हावा यासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर रखडलेल्या कामाला सुरुवात झाली मात्र कल्याण पूर्वच्या नागरीकांना वेठीस धरण्याचे काम पालिका आणि त्यांचे अधिकारी करत आहे. पूनालिंक रोडवरील सिमेंट रस्ता रखडला आहे तो केवळ पालिकेच्या कामचुकार अधिकारी आणि त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरीकांना त्रास होत असल्याचा आरोप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com