कल्याणमध्ये सकाळ चित्रकला स्पर्धेचा उत्साह

रविंद्र खरात
रविवार, 17 डिसेंबर 2017

बच्चे कंपनी ....फेव्हरेट 
स्पर्धकांना प्रश्न पत्रिका ही होती त्यात आवडती मालिका मध्ये फेव्हरेट तुझ्यात जीव रंगला आणि लागीर झालं जी ही सर्वात जास्त उत्तर तर आईस्क्रीम आणि घराचे सर्वात फोटो काढण्यात बच्चे कंपनी रंगली होती. सकाळच्या पहिल्या सत्रात 333 स्पर्धक तर दुसऱ्या सत्रात 600 स्पर्धकांनी सहभाग घेत दैनिक सकाळची चित्रकला स्पर्धा यशस्वी केली. 

कल्याण : सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धा कल्याण पूर्व नांदीवली परीसरातील बी. टी. गायकवाड (हॉली पॅराडाईज) स्कूल पार पडली. कल्याण पूर्व मधील 10 ते 12 शाळेतील चार गटातील एकूण 933 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. अ 302 ब 303 क 256ड 72 असे एकूण 933 सहभागी झाले होते. 

सकाळचा गारवा आणि थंडी यात रविवार असताना सकाळी साडे आठ पासून चित्रकला स्पर्धा सहभागी होण्यासाठी पालक आणि विद्यार्थी वर्गाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. जणु काही परीक्षा आहे असे वातावरण निर्माण झाले होते . स्पर्धा आपला पाल्य जिंकावा यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांना समाजवत असताना दिसत होता.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बी. टी. गायकवाड (हॉली पॅराडाईज) स्कूलचे अध्यक्ष जगदीश म्हात्रे, खजिनदार किशोर गायकवाड, सचिव राजकुमार सुरवसे, दिपक डगळे समवेत सामाजिक संस्था संत निरंकारी सत्संग (नांदीवली) यांचे कार्यकर्ते सुनील कसबे, भिवा साळवे, ओमकार एटम विकास एटम, इंदूमती गायकवाड, वनाजी निमसे, कल्पना शेडगे, शँकर शेडगे, गंगाधर गाडे, विश्वनाथ बोनवटे, रविंद्र पवार तर कल्याण पूर्व मधील बी. टी. गायकवाड स्कूल, गायत्री विद्यालय, प्रगती विद्यालय, भावे विद्यालय, सिद्धार्थ विद्यामंदिर, हॉली क्रॉस स्कूल, स्वामी समर्थ विद्यालय, साई स्कूल, आयडीयल स्कूल, तिसाई विद्यालय, सेंट थॉमस आदी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक सतीश भिसे सर, वसंत पाटील, सुंगधा हरड, स्नेहा चव्हाण, वर्षा पाटील, प्रतीक्षा रसाळ, प्रवीण भाने, स्मिता शिंदे, कुमुदिनी मोरे, सीमा पाटील, अविनाश काळे आदींनी उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत केली.

बच्चे कंपनी ....फेव्हरेट 
स्पर्धकांना प्रश्न पत्रिका ही होती त्यात आवडती मालिका मध्ये फेव्हरेट तुझ्यात जीव रंगला आणि लागीर झालं जी ही सर्वात जास्त उत्तर तर आईस्क्रीम आणि घराचे सर्वात फोटो काढण्यात बच्चे कंपनी रंगली होती. सकाळच्या पहिल्या सत्रात 333 स्पर्धक तर दुसऱ्या सत्रात 600 स्पर्धकांनी सहभाग घेत दैनिक सकाळची चित्रकला स्पर्धा यशस्वी केली. 

दैनिक सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या सहभागी झालेल्या बच्चे कंपनीची संख्या पाहून आम्ही चकीत झालो. मुलांच्या गुणांना वाव देण्यासाठी अश्या स्पर्धा झाल्या पाहिजे आणि आमच्या संस्थेकडून जरूर मदत करू अशी प्रतिक्रिया बी. टी. गायकवाड शाळेचे अध्यक्ष जगदीश म्हात्रे आणि खजिनदार किशोर गायकवाड यांनी दिली.

Web Title: Marathi news Kalyan news Sakal Chitrakala competition