शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये श्री शिव संस्कार महोत्सवाचे आयोजन

रविंद्र खरात
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या तरुण पिढीला आदर्श निर्माण व्हावा यासाठी कल्याण पूर्व मधील सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी कल्याण पूर्व मध्ये श्री शिव संस्कार महोत्सव 2018 च्या अंतर्गत शनिवार ता. 17 फेब्रुवारी 2018 ते सोमवार 19 फेब्रुवारी 2018 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण पूर्व मध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शिवजयंती उत्सव समिती स्थापन केली आहे, हे  वर्ष 32 वे असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री शिव संस्कार महोत्सव 2018 हा 17 फेब्रुवारी 2018 ते 19 फेब्रुवारी 2018 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे . 

श्री शिव संस्कार महोत्सवाला शनिवारी (ता. 17) सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 9 या कालावधीत विद्यार्थी ते जेष्ठ नागरीकांनसाठी अनुभवा सर भालाजी पेंढारकर निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे दिवसभर 4 शो पाहता येणार आहेत . 

रविवार ता 18 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धा आयोजित केली असून दुपारी 1 वाजता शिवचरित्रावर आधारीत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली आहे .तर सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण या विषयावर डॉ परीक्षित शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे , याच कालावधीत शिव कल्याण पुरस्कार वितरणसोहळा आणि चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच श्री शिव संस्कार महोत्सवाचा समारोप सोमवार ता 19 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुकीने होणार असून विशेष आकर्षण म्हणजे चित्ररथ सजावट स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी लेझिम स्पर्धा आयोजित केली आहे. या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समिती विश्वस्त नाना सूर्यवंशी यांनी केले आहे. 

Web Title: Marathi news kalyan news shivaji maharaj birth anniversary programs