कुंदन भंडारीला पोलिस कोठडी 

कुंदन भंडारीला पोलिस कोठडी 

नवी मुंबई - महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचा वाहनचालक कुंदन भंडारी याला पवनेल न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अश्‍विनी बिंद्रे प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने मंगळवारी कुंदन भंडारीला चौकशीअंती अटक केली होती. 

नवी मुंबई पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे यांच्या बेपत्ता प्रकरणात पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील दोघांना अटक केली आहे. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांनी नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करण्यास नकार दिल्याने या प्रकरणाच्या खोलात जाऊन ठोस पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले आहे. या प्रकरणातील इतर धागेदोरे तपासताना कुरुंदकरांचा वाहनचालक कुंदन भंडारीची चौकशी करण्याचे पोलिसांनी ठरवून त्याला चौकशीसाठी बोलाविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com