स्वप्नील सोनावणे हत्याप्रकरण : वकिलावर सशस्त्र हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

नवी मुंबई : स्वप्नील सोनावणे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख वकील अमित कटारनवरे यांच्यावर आठ ते दहा लोकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. अॅड कटारनवरे यांच्या मोटारीची मोडतोड झाली आहे. पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून सोनावणे याची नेरूळ येथे हत्या झाली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणात आधी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांची चौकशी करावी, अनुसूचित जाती-जमाती सुधारणा अधिनियम २०१५ च्या कलाम १४(२) अन्वये २ महिन्यात या खटल्याचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी आदी मागण्या यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे सोनावणे कुटुंबियांनी केल्या आहेत. 

या खटल्यातील वकिलांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे झाली होती. 25 ऑगस्ट 2016 रोजी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटले होते.