बदलत्या हवामानामुळे मुरबाड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

नंदकिशोर मलबारी
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

सरळगाव : मुरबाड तालुक्यातील आंब्याला आलेला मोहर अचानक बदलत्या हवामानामुळे खडतो की काय या भीतीमध्ये शेतकरी राजा सापडला आहे. यावर्षी गावठी आंबा आणि लागवड केलेल्या हापूस आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने आंबा पिकांवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

तसेच अनेक फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची झाडे आहेत. या आंब्यांनाही मोठ्या प्रमाणात मोहर लागल्याने यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, या आनंदात शेतकऱ्यांसोबत फार्म हाऊसचे मालिकही आनंदात आहेत. तालुक्यात गावठी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने या आंब्यावर उदरनिर्वाह करणारे अनेक शेतकरी आहेत. 

आदिवासी भागात जंगलातील आंबे आणून बस थांब्यावर ते विकून आपला शैक्षणिक खर्च भागविणारे अनेक विद्यार्थी आहेत. जंगलातील आंब्यानाही मोठ्या प्रमाणात मोहर दिसू लागल्याने आदिवासी लोकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ओखी वादळामुळे गेले चार दिवस ढगाळ वातावरण झाल्याने आंब्यांना आलेला मोहोर खडून जातो की काय या भीतीत शेतकऱ्यांसह यावर विसंबून असलेले अनेक विद्यार्थी चिंत्तेत आहेत.

Web Title: marathi news local thane news farmers weather changing