तीस विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरण पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

दहावीत कॉपी करणाऱ्या तब्बल तीस विद्यार्थ्यांना मुंबई विभागीय बोर्डाने रंगेहाथ पकडले. या तीस विद्यार्थ्यांची यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मुंबई : दहावीत कॉपी करणाऱ्या तब्बल तीस विद्यार्थ्यांना मुंबई विभागीय बोर्डाने रंगेहाथ पकडले. या तीस विद्यार्थ्यांची यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

दहावीत व्हॉटसअपद्वारे पेपरफुटीचा प्रकार न घडल्याने मुंबई विभागीय बोर्डाने सुस्कारा टाकला होता. परंतु वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षांच्या दरम्यान नोट्‌स घेऊन बसणे, चिठ्ठ्यांवर उत्तरे लिहून आणणे आदी प्रकारांतून भरारी पथकांना विविध परीक्षा केंद्रांतून तीस विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांवर गंभीर आरोप आहेत. या सहा विद्यार्थ्यांना दोन वर्षे परीक्षा देता येणार नाही, अशी माहिती मुंबई विभागीय बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. तर इतर विद्यार्थ्यांना दोन ते तीन परीक्षांची बंदी आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या प्रकरणांबाबत अजूनही चौकशी सुरु असून, त्यांच्याबाबत काही दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असे जगताप म्हणाले.

टॅग्स