शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी : राधाकृष्ण विखे पाटील

रविंद्र खरात
शुक्रवार, 23 जून 2017

"नेवाळी प्रकरणामध्ये राज्य सरकारने हलगर्जीपणा केला आहे.परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नाही. स्थानिक शेतकरी वर्गाला विश्वासात घेवून राज्य सरकार चर्चा करू शकले असते. मात्र तसे झाले नाही. सरंक्षण विभागाला किती जागा हवी हे देखील स्पष्ट नाही. आता तर त्या विभागाचे अधिकारी ही गायब आहेत', असा आरोप यावेळी बोलाताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

कल्याण - कल्याण मधील नेवाळी परिसरात गुरुवारी शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही पाटील यांनी केली.

नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. याविरुद्ध शेतकऱ्यांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला होता. यामध्ये काही शेतकरी जखमी झाले होते. त्यांना कल्याण पूर्वमधील मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज (शुक्रवार) पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेसचे कल्याणमधील जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, संतोष केने, शारदाताई पाटील, गंगाराम शेलार, वंडार पाटील, अर्जुन बुवा चौधरी, गजानन पाटील, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जखमी शेतकरी, पोलिस, डॉक्‍टर यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना विखे पाटील म्हणाले, "नेवाळी प्रकरणामध्ये राज्य सरकारने हलगर्जीपणा केला आहे.परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नाही. स्थानिक शेतकरी वर्गाला विश्वासात घेवून राज्य सरकार चर्चा करू शकले असते. मात्र तसे झाले नाही. सरंक्षण विभागाला किती जागा हवी हे देखील स्पष्ट नाही. आता तर त्या विभागाचे अधिकारी ही गायब आहेत', असा आरोप यावेळी बोलाताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

"राज्य सरकारकडून बंदुकीचे धाक दाखवून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडले जात आहे हे लोकशाहीमध्ये शक्‍य नाही. आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये जाब विचारुन ही निषेधार्ह्य घटना आहे. राज्य सरकार असंवेदनशील असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे', असेही ते म्हणाले.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण