मालाडमध्ये साई मंदिरात झाली रोजा इफ्तार पार्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मालाड : शहरातील अतिशय संवेदशील परिसर म्हणून ओळख असलेल्या मालवणी येथील एका साई मंदिरात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेतून सामाजिक एकता आणि बंधुत्वाचे दर्शन घडविल्याने परिसरात या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

मालाड शहरातील मालवणी परिसर हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. मात्र येथील हिंदू समुदायाने मुस्लिम समुदायासाठी मंदिरामध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत हा समज खोटा ठरवला आहे. मालवणी परिसरातील गेट क्रमांक सहा येथील साई सावली मंदिरात गुरुवारी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. साई सावली मंदिराचे कार्यवाह रविंद्र डोंगरे यांनी मुस्लिम बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परिसरातील सर्व धर्मीय महिला आणि पुरुषांनी मंदिरात बसून इफ्तार करून रोजा सोडला. या वेळी मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगरे तसेच अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम धार्मिक सलोखा जपणारा आणि बंधुभावाचे दर्शन घडविणारा ठरल्याने परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.