प्लास्टिकमुक्त मुंबईचा सराव दहीहंडीतून संदेश 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

घाटकोपर : 'सुंदर मुंबई, हरित मुंबई' असा प्लास्टिकमुक्त मुंबईचा संदेश देणारी सराव दहीहंडी रविवारी (ता. 13) जय संतोषी माता चौक येथे होणार आहे. एन वॉर्ड प्रभाग समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील हा उपक्रम राबवत आहेत. 

सराव दहीहंडीचे यंदा तिसरे वर्ष आहे. या वेळी हंडी पथकांना सामाजिक संदेश देण्यासाठी प्लास्टिकमुक्त मुंबई, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई ही संकल्पना राबवली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. उत्सवामुळे अनेक लोक एकत्र येतात. ही आनंदाची बाब आहे; पण असे उत्सव साजरे करताना पर्यावरणावर दुष्परिणाम करणाऱ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. नागरिकांकडून सर्रास प्लास्टिकचा वापर होतो.

महापालिकेकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते. 'सकाळ'ने प्लास्टिकमुक्तीसाठी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पद आहे. नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष या नात्याने गोविंदा पथकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम कळावेत, यासाठी 'सकाळ'च्या मोहिमेला पाठिंबा देत सराव दहीहंडी शिबिरात प्लास्टिकमुक्त मुंबईची संकल्पना राबवली जाईल.

प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन आम्ही व्यासपीठावरून करू. तसेच शिबिरात सहभागी होणाऱ्या गोविंदांना प्लास्टिकचे पर्यावरणावर व आरोग्यावरील दुष्परिणामांची माहिती देणारी पत्रकेही वाटली जातील, असेही पाटील यांनी सांगितले.