मुंबईत मराठा मोर्चाचा 'फिव्हर'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचा 'फिव्हर' मुंबईत जोर धरू लागला आहे. आज राज्यातील विविध मुस्लिम संघटनांनी मोर्चाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला. मुंबई वाहतूक पोलिसांनीही मोर्चा मार्ग, पार्किंग व वाहतुकीची यंत्रणा सुरळीत होईल, यासाठी कंबर कसली आहे. 

मोर्चात सहभागी होणारी वाहने व नागरिकांना मोर्चाच्या मार्गाबाबतची माहिती एमएम रेडिओवरून देण्यात येणार आहे. काही पोलिस व्हॅनही लाऊडस्पीकरवरून मार्गदर्शन करणार आहेत. 

मोर्चा आयोजकांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. या वेळी मुंबईत बुधवारी (ता. 9) काढण्यात येणारा मोर्चा ऐतिहासिक ठरेल यासाठी राज्यभरात तयारी पूर्ण झाली आहे, असे आयोजकांनी सांगितले. मराठा समाजाच्या मागण्या व समाजातील भावना लाखोंच्या मोर्चाने मूकपणे मांडण्यात येत आहेत. राज्य सरकारने या निशब्द एल्गारची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे आयोजकांनी सांगितले. 

मराठा क्रांती मोर्चा आतापर्यंतच्या सर्व मोर्चातील आचारसंहितेनुसारच होणार असून, मराठा स्वयंसेवकांची फळी त्यासाठी सज्ज झाली आहे. 

शिवाजी मराठा मंदिर येथील वॉर रूममधून मोर्चाच्या आयोजनाबाबतची सर्वस्वी काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मुस्लिम संघटनांचा पाठिंबा 
मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक व राज्यभरातील मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक झाली. मराठा मोर्चाला सर्व मुस्लिम पाठिंबा देत असून, या मोर्चेकऱ्यांना पाणी व नाष्टा देण्याची सोय मुस्लिम संघटना पार पाडतील, अशी माहितीही त्यांनी दिली.