उल्हासनगर स्थापनेची कोनशिला कोंडवाड्यात! 

दिनेश गोगी
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

उल्हासनगर : उल्हासनगरच्या स्थापनेला उद्या 68 वर्ष पूर्ण होत आहेत; मात्र शहराच्या स्थापनेची एक आठवण असलेली कोनशिला सध्या तरणतलावाच्या चार भिंतींच्या कोंडवाड्यात बंदिस्त आहे. या कोनशिलेचे स्थान सध्या अडगळीत आहे. 

उल्हासनगर : उल्हासनगरच्या स्थापनेला उद्या 68 वर्ष पूर्ण होत आहेत; मात्र शहराच्या स्थापनेची एक आठवण असलेली कोनशिला सध्या तरणतलावाच्या चार भिंतींच्या कोंडवाड्यात बंदिस्त आहे. या कोनशिलेचे स्थान सध्या अडगळीत आहे. 

भारताची फाळणी झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील सिंधी भाषिकांना उल्हासनगरात आश्रय देण्यात आला. त्यांना निर्वासित म्हणून उल्हासनगरात वास्तव्यासाठी जागा देण्यात आली. पाकिस्तानमध्ये जुलमाने त्रस्त सिंधी बांधवांनी संपत्ती तेथेच सोडून मिळेल त्या सामानासह उल्हासनगर गाठले. जून 1948 मध्ये निर्वासितांची छावणी तयार केल्यानंतर 8 ऑगस्ट 1949 रोजी उल्हासनगरची स्थापना करण्यात आली होती. 

महापालिकेची प्रशस्त वास्तू असलेल्या इमारतीच्या मागे, शहराच्या स्थापनेची कोनशिला आहे. ती तरणतलावाच्या चार भिंतींच्या कोंडवाड्यात बंदिस्त आहे. साधारणतः एखाद्या प्रकल्प वा वास्तूच्या भूमिपूजन वा उद्‌घाटनाची कोनशिला प्रथमदर्शनी लावली जाते. सध्या बहुतांशी राजकीय नेत्यांचा नावासाठी हट्ट असल्यामुळे कोनशिलेला प्राधान्य दिले जाते; मात्र वर्षानुवर्षे उल्हासनगर स्थापनेची कोनशिला अडगळीत पडून आहे. या कोनशिलेला प्रथमदर्शनी लावण्यासाठी राजकीय नेत्यांबरोबरच आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

Web Title: marathi news marathi website Ulhasnagar Mumbai news