दिवाळीच्या तयारीमध्ये दिव्यांगाचा हातभार 

श्रीकांत सावंत
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

ठाणे : दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असल्यामुळे घरोघरी दिवाळीची जय्यत तयारी सुरू असून या दिवाळीच्या तयारीमध्ये हातभार लावण्यसाठी ठाण्यातील दिव्यांग मुलेही सक्रीय झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थाच्या विद्यार्थांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने निरनिराळ्या गृहपयोगी वस्तूंची निर्मिती केली असून त्यांची विक्री करण्यासाठी ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये विशेष विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे : दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असल्यामुळे घरोघरी दिवाळीची जय्यत तयारी सुरू असून या दिवाळीच्या तयारीमध्ये हातभार लावण्यसाठी ठाण्यातील दिव्यांग मुलेही सक्रीय झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थाच्या विद्यार्थांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने निरनिराळ्या गृहपयोगी वस्तूंची निर्मिती केली असून त्यांची विक्री करण्यासाठी ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये विशेष विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवारी या मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या वीस संस्थांचे इथे स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलवर नागरिकांना आकर्षक दिवाळी कंदील, दिवे, पणती, तोरण, मेणबत्ती, उटणे, दिवाळी फराळ, पेपर बँग, हात रुमाल, किचन अॅप्रोन, चॉकलेट्स, ज्वेलरी, किचन नॅपकिन्स, मसाले, गिफ्ट एन्व्हलप, रंगीत फुलांचे बुके व फुले आणि इतर गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येणार आहेत. 

दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी आनंदोत्सव साजरा होत असताना या आनंदोत्सवाचा लाभ दिव्यांग ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही घेता यावा यासाठी जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. दिव्यांगाना रोजगार मिळावा तसेच त्यांच्या संस्थेला अर्थिक मदत करण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने गृहपयोगी वस्तुंचे प्रदशर्न आयोजित करण्यात येते. यंदा हा विक्री मेळावा गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार 13 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 8 ते रात्री 9 यावेळेपर्यंत सुरु राहणार आहे.

उद्घाटनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमन वार आणि अन्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक संस्थेला भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आणि वस्तूही खरेदी केल्या. या मेळाव्यात अस्तित्व मतिमंद मुलांची शाळा, जव्हेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालय, जागृती पालक संस्था, कमलिनी कर्णबधीर विद्यालय, किशनचंद चेलाराम स्कूल, क्षितिज मतीमंद मुलांची शाळा, एम.बी. ए. फौंडेशन, ओमकार कर्णबधीर विकास संस्था, पालवी कर्णबधीर विद्यालय, प्रज्ञा-करुणा मुकबधीर विद्यालय, पॅराप्लेजिक्स फौंडेशन, रोटरी स्कूल ऑफ डेफ, राजहंस फौंडेशन ऑटिस्टिक व्होकेशनल सेंटर, सोसायटी फॉर दि रिदिव्यांग या संस्थांमधील विद्यार्थ्यांची कलाकुसर नागरिकांना पाहता येणार आहे. तर दिव्यांग रिहॅबिटेशन ऑफ पॅराप्लेजिक्स संवाद कर्णबधीर प्रबोधिनी, स्नेहालय मतिमंद मुलींची शाळा, स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, विकास मतिमंद विद्यालय, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट आदि संस्था सहभागी झाल्या आहेत.

दिव्यांग व्यक्ती व संस्थाच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या या साहित्य विक्री मेळाव्याला ठाणेकर नागरिकांनी भेट देऊन, विद्यार्थाचे साहित्य खरेदी करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देऊन दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींचे मनोबल वाढवण्याचे आवाहन समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील यांनी केले आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मानसी बोरकर, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यशवंत मोरे, समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi websites Diwali 2017 Mumbai News