जलयुक्त शिवार अभियानासाठी सिद्धिविनायक न्यासचे एक कोटी 

Representational image of Jalayukta Shivar
Representational image of Jalayukta Shivar

ठाणे : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश आज प्रदान करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द केला. 

आदेश बांदेकर म्हणाले, ""सिद्धिविनायक न्यास नेहमीच सामाजिक जाणिवेतून मदत करीत आला आहे. मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा जलयुक्तसारखे अभियान असो. सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून गेल्या चार महिन्यांत चार कोटी 50 लाख रुपयांची मदत गरजू रुग्णांना न्यासातर्फे देण्यात आली आहे.''

जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात दोन वर्षांत चांगले काम झाले आहे. याद्वारे जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचे आणि पाणीटंचाई मिटवण्याचे प्रयत्न आहेत. श्री सिद्धिविनायक न्यासासारख्या आणखीही काही संस्थांनी योगदान देऊन सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात 44 गावे निवडण्यात आली. सुमारे 40 कोटींचा आराखडा आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com