प्रस्तावित मंडाला तुरुंगात बॉम्बप्रूफ बराक 

Representational Image
Representational Image

मुंबई : दहशतवादी हल्ला, साखळी बॉम्बस्फोट अशा घटनांनी सुरक्षा दलांना अधिक सतर्क केले आहे. यामध्ये तुरुंग प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळेच मानखुर्दच्या मंडाला येथे अद्ययावत तुरुंग बांधण्याचा प्रस्ताव आहे. या तुरुंगात अतिमहत्त्वाच्या कैद्यांना अंडा सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामधील एक बराक बॉम्बप्रूफ तयार करण्याचा विचार सुरू आहे. 

मुंबईवर 1993, 2002, 2003 आणि 2008 मध्ये दहशतवादी हल्ले झाले. यामध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पोलिसांनी या हल्ल्यांना जबाबदार असलेल्या दाऊदच्या हस्तकांसह आयएसआयचे सक्रिय सदस्य ते पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली. या हल्ल्यातील अनेक आरोपींना मुंबई, ठाणे, तळोजा, नाशिक आदी मोठ्या तुरुंगांत ठेवण्यात आले. विशेष म्हणजे 26/11 चा मास्टरमाइंड अबू जुंदाल, अजमल कसाबला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातल्या विशेष अंडासेलमध्ये ते होते. त्यांच्या सुरक्षेकरता सरकारला कोट्यवधींचा खर्च करावा लागला.

कसाबला आर्थररोडमध्ये ठेवण्यात आले होते, त्या वेळी त्रिस्तरीय सुरक्षा होती. बाहेरील बाजूने इंडो-तिबेटियन, स्थानिक पोलिस आणि तुरुंग प्रशासन अशी ती सुरक्षा होती. त्याच्यामुळे आर्थररोडला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. त्या वेळी सुरक्षेचा विचार करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंसगद्वारे खटल्याची सुनावणी झाली.

सध्यस्थितीचा विचार केला तर आर्थर रोड, तळोजा, ठाणे तुरुंगात अंडासेल आहे. यामध्ये अतिमहत्त्वाच्या कैद्यांना ठेवण्यात येते, पण भविष्याचा विचार करून अतिमहत्त्वाच्या कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाने पर्याय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजेच मानखुर्दच्या मंडाला येथे नवीन तुरुंग बांधण्याचा पर्याय.

त्यासाठी जागेच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन एकरवर हे तुरुंग बांधण्यात येणार आहे. यामध्ये अतिमहत्त्वाच्या कैद्यांना ठेवण्यात येणार आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे बराकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या खांडवा तुरुंगातून दहशतवादी पळून गेले होते. अशा घटना रोखण्यासाठी सेन्सर वॉल तयार करण्यात येणार आहे. दहशतवादी कृत्यातील आरोपींसाठी बॉम्बप्रूफ बराकी तयार करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com