गिरगावातील 167 वर्षांच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक सोहळा संपन्न

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई:  दक्षिण मुंबईतील गिरगाव वैद्यवाड़ी येथील 167 वर्षे पुरातन असलेल्या आणि न्यायालयीन लढाईत जिंकलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशीनिमित्त कार्तिक सोहळा मंदिरात दीपोत्सवाने  हर्षोल्हासात संपन्न झाला.

पहाटे 5 वाजता विठ्ठल-रखुमाईस अभ्यंगस्नान व अभिषेक षोडशोपचार पूजनानंतर थेट गाभाऱ्यात चरण स्पर्श दर्शन सुरु करण्यात आले. उपस्थित भाविकांना उपवास फराळ आणि तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. ख़ास करुन महिला भगिनीना निसर्गाचे संरक्षण आणि पर्यावरण रक्षणाची शपथ देत तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले.

विठ्ठल रुक्मिणी सेवा समितीचे अध्यक्ष आनंद सावंत,श्रीमती रानडे बाई,प्रमोद मेस्त्री,संजय मेरवेकर आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेत कार्तिकउत्सव साजरा करण्यासाठी सर्व गिरगावकर आणि मुंबईकरांना आमंत्रित केले होते.

मुंबईतील विविध विभागातून शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेसह विभागातील विविध भजनी मंडळातील सदस्यानी मंदिरात येऊन विट्ठल रखुमाइचे दर्शन घेत आपली श्रद्धा अर्पण केली.