बोगस डॉक्‍टरमुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बळी? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

उल्हासनगर : धोबीघाट येथील महाविद्यालयीन मुलीचा बोगस डॉक्‍टरमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील बोगस डॉक्‍टरांच्या विरोधात सोमवारपासून मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. तर बोगस डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. 

सिमरन शंभू शर्मा असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती अकरावीत होती. ती धोबीघाट परिसरात राहते. एका स्थानिक डॉक्‍टरने तिला दोन दिवस तापासाठी औषध दिले; मात्र काहीही फरक न पडल्यामुळे तिच्या वडिलांनी रविवारी दुसऱ्या स्थानिक डॉक्‍टरकडे नेले. त्याने सिमरनला तासाभरात तीन इंजेक्‍शने दिली. त्यानंतर तिला उल्हासनगरमधील एका स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दोन इंजेक्‍शने देण्यात आली. त्यानंतर तिला ठाण्यातील रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. तेथे तिचा सायंकाळी मृत्यू झाला. वडिलांसोबत सकाळी पायी गेलेली सिमरन सायंकाळी मृतावस्थेत स्ट्रेचरवर आल्याने रहिवाशांना धक्का बसला. 

या घटनेला बोगस डॉक्‍टर जबाबदार असल्याचा आरोप 'अशोका फाऊंडेशन'चे संस्थापक शिवाजी रगडे यांनी केला. तसेच पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 
या घटनेसंदर्भात पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. सिमरन हिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांची चौकशी केली जाईल. तसेच शहरातील बोगस डॉक्‍टरांवर सोमवारपासून कारवाई केली जाणार असल्याचे रिजवानी यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites Mumbai news Bogus Doctor