छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर भ्रष्टाचार मुक्ततेचा सप्ताह 

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भ्रष्टाचार मुक्तता आणि सावधानता, सतर्कता जागरुकता सप्ताह साजरा करण्यात आला. रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे आणि पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी यात सहभागी घेत प्रवाशांना भ्रष्टाचार मुक्तता आणि सावधानता, सतर्कतेबद्दल विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले. 

'रेल्वे स्थानकावर आपण स्वत:च्या सुरक्षेची काळजी कशी घ्यावी, आपात्कालीन स्थितीत व्यवस्थेकडून मदत कशी मिळवावी' या मुद्यांबरोबरच 'भ्रष्टाचार मुक्तीसाठी काय उपाययोजना करता येतील, प्रवासात संशयित व्यक्ती वा सामान आढळल्यास काय पावले उचलाल' याचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले. कुलाबा येथील ससून गोदीतील क्षेत्रीय संचालक डॉ. एल. रामलिंगम आणि त्यांच्या कार्यालयीन कर्मचारी वर्गाने हे मार्गदर्शन केले. 

यावेळी कार्यालयीन अधिक्षक गणपत पावले, अशोक कदम आणि आनंद गंगाधन निकाळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.