विजेची मागणी पावसामुळे घटली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे विजेच्या मागणीत आजच्या दिवसात घट झाली; मात्र भारनियमन आजही काही ग्राहक श्रेणींच्या शहरांसाठी कायम ठेवण्यात आले होते.

आज दिवसभरात विजेची सरासरी मागणी 16501 मेगावॅट होती, तर विजेची उपलब्धतता 15701 मेगावॅट इतकी होती. 800 मेगावॅट तुटवड्यासाठी ई ते जी 3 या ग्राहक श्रेणीत भारनियमन करण्यात आले.

पावसामुळे विजेची मागणी 1500 मेगावॅटने कमी होण्यासाठी मदत झाली. त्यामुळे विजेचे भारनियमनाचे तासही कमी होण्यास मदत झाली. आजही कोळशाअभावी महानिर्मिती; तसेच खासगी कंपन्यांचे बरेचसे संच बंद होते. तर काही संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठीची वीज खरेदी म्हणून महावितरणने 700 मेगावॅट वीज अल्पमुदतीच्या करारावर खरेदी केली आहे, तर आणखी 700 मेगावॅट वीज येत्या दोन दिवसांमध्ये पॉवर एक्‍सचेंजमधून उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यामुळे भारनियमनाच्या तासांमध्ये घट होण्याची शक्‍यता महावितरणने वर्तवली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प राज्याच्या मदतीला पुन्हा एकदा धावून आला आहे. आज 1200 मेगावॅट वीज या प्रकल्पातून राज्यासाठी उपलब्ध झाली. 

Web Title: marathi news marathi websites mumbai news Electricity MSEDCL