एल्फिन्स्टन दुर्घटनेला रेल्वे प्रशासनच जबाबदार : शर्मिला ठाकरे

अक्षय गायकवाड
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

विक्रोळी : एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेला रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केला. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या आणि टागोर नगर येथील रहिवासी असलेल्या रोहित परब याच्या कुटुंबियांची त्यांनी आज दुपारी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सत्तेत आल्यानंतर पुलांची संख्या वाढवू, फलाटांची उंची वाढवू, लोकलफेऱ्या वाढवू, त्यांनी कुठे काय केले आपल्याला दिसते आहे का? अशी टीका ही त्यांनी भाजपा सरकारवर केली. दररोज लोकलखाली माणसे मरत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इतके टॅक्स वाढवतात, ते लोकांवर खर्च तर करा असेही त्या म्हणाल्या.

ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्या दिवशी ते गरबा खेळण्यात व्यस्त होते, मला वाटते माणुसकीच मेली आहे, अशी टीका त्यांनी खासदार किरीट सोमया यांचे नाव न घेता केली. 

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या वारसांना रेल्वेत नोकरी मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 

एल्फिन्स्टन घटनेत रोहित चा एक भाऊ अपंग झाला आहे, आता परब कुटुंबियांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बुलेट ट्रेन पेक्षा मुंबईची रेल्वे सेवा नीट ठेवा, ज्या प्रमाणात कर घेता त्या प्रमाणात पायाभूत सुविधा द्या, असे त्या म्हणाल्या.