महावितरण घेणार रस्त्यांतील कामांची जबाबदारी 

MSEDCL
MSEDCL

मुंबई : विजेच्या पायाभूत यंत्रणांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आता महावितरणच रस्त्यांच्या कामाची जबाबदारी घेणार आहे. राज्यातील काही परिमंडलांत भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदण्यापासून ते पूर्ववत करण्यापर्यंतची कामे करण्याच्या तयारीत महावितरण आहे. 

महापालिकांसोबत याबाबतचा करार करण्याची तयारी महावितरण करत आहे. महापालिकांना रस्ते खोदकामासाठी द्यावे लागणारे कोट्यवधींचे शुल्क कमी व्हावे, असा महावितरणचा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांवर येणारा आर्थिक भार कमी होईल, असेही महावितरणचे मत आहे. सध्या 'एमएमआर' प्रदेशात प्रस्तावित 166 किलोमीटर भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामासाठी खोदकाम शुल्क म्हणून 122 कोटी रुपये भरण्याची वेळ महावितरणवर आली आहे. 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल महापालिकेकडून सध्या महावितरणच्या विविध प्रकल्पांतर्गत रस्त्यांच्या खोदकामासाठी विविध पद्धतीने शुल्क आकारण्यात येते. यापुढे प्रस्तावित कामांसाठी हे शुल्क कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणार आहे. म्हणूनच महापालिका आयुक्तांसोबत बैठका घेऊन हे शुल्क कमी करण्याची मागणी महावितरण करत आहे. 

दोन वर्षांची हमीही घेणार 
खोदकाम केल्यावर रस्ता पूर्ववत तयार करून देण्याची जबाबदारी घेण्यास महावितरण तयार आहे. रस्ता पुन्हा तयार करून दिल्यानंतर त्या रस्त्यासाठी दोन वर्षांची हमी घेण्याची महावितरणची तयारी आहे. भूमिगत वाहिन्यांसाठी नियमित कामे तसेच प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी महावितरण महापालिकांसोबत असा करार करणार आहे. नागपूर महापालिकेने अशा स्वरूपाचा करार महावितरणसोबत केला आहे. याच धर्तीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल महापालिकांसोबत करार करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com