शिवम ज्वेलर्सच्या दरोड्यात नातेवाइकाचा हात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नालासोपारा : तुळींज परिसरात शिवम ज्वेलर्सवर 26 ऑगस्टला दरोडा पडला होता. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. दुकान मालकाच्या मेव्हण्याने या दरोड्याचा कट रचला होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली असल्याची माहिती दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व तुळींज परिसरातील शिवम ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी मालक रूपसिंग राजपूत याला बांधून 55 लाखांचे दागिने आणि 28 हजारांची रोकड घेऊन लंपास केली होती.

कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये, दरोडेखोरांनी दुकानातील सीसी टीव्ही आणि त्याचा डीव्हीआरसुद्धा लंपास केला होता. यामुळे तुळींज पोलिसांपुढे या गुन्ह्याची उकल करताना मोठे आव्हान होते. पोलिसांना दुकानात काम करणाऱ्या रूपसिंग राजपूत यांचा मेव्हणा मानुसिंग राजपूत (वय 32) याच्यावर संशय होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

वापी (गुजरात) येथील मनुसिंगचा मित्र छगनलाल रावल (वय 33) आणि उदयपूर (राजस्थान) येथील नाहर सिंह (वय 35) यांच्या मदतीने हा दरोडा घातला होता. नाहर सिंग याने चोरी केलेला माल हा उदयपूर येथे आपल्या बहिणीच्या घरी ठेवला होता. तो पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.