आयआयटी पवईच्या मानांकनात सुधारणा 

आयआयटी पवईच्या मानांकनात सुधारणा 

मुंबई : पवईतील आयआयटी संस्थेच्या मानांकनात पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे. आयआयटीच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असताना देश पातळीवरील मानांकनही सुधारले आहे.

आयआयटी पवईचा "क्‍यूएस युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स ब्रिक्‍स'च्या मानांकनात देशभरातील पहिल्या 10 शैक्षणिक संस्थांच्या यादीत समावेश झाला आहे. देशातील विद्यापीठांच्या यादीत तेराव्या स्थानावर असणाऱ्या आयआयटी पवईने नववा क्रमांक मिळवला आहे. 

क्‍यू. एस. विद्यापीठातर्फे जगभरातील उच्च शिक्षणातील संस्थांच्या मानांकनाची माहिती दिली जाते. भारतातील शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेबाबतची नवी यादी बुधवारी जाहीर झाली. आयआयटीला निकषांत 100 पैकी 83.6 गुण मिळाले.

शिक्षणातील कामगिरीबाबत 98.1, रोजगार निर्मितीबाबत 99.7, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तरात 47.8, पीएचडी प्राध्यापकमध्ये 96.9, कर्मचाऱ्यांबाबत 95.4 गुण मिळाले; मात्र आंतरराष्ट्रीय कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या निकषात आयआयटीचा दर्जा सुमार आहे. 

आयआयटीला आंतरराष्ट्रीय कर्मचारी निकषांत 15.4; तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी निकषांत 7.6 गुण मिळाले; मात्र रोजगारनिर्मितीत आयआयटीचे गुण उत्तम आहेत. 

देशभरातील पहिल्या 10 शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटीचे नाव येणे आनंदाची बाब असल्याचे आयआयटीचे संचालक देवांग खतार यांनी सांगितले. शिक्षण व संशोधनावर भर दिल्याने मानांकन सुधारल्याचे खतार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com