फेरीवाल्यांवर दंडाचा बॉम्ब 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

मुंबई : महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ऐन दिवाळीत फेरीवाल्यांवर दंडाचा बॉम्ब टाकला आहे. दंडाच्या 240 या किमान रकमेत वाढ करून ती 480 रुपये करण्यात आली आहे, तर जास्तीत जास्त 20 हजार रुपये असलेला दंड 50 हजार रुपये करण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. 

मुंबई : महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ऐन दिवाळीत फेरीवाल्यांवर दंडाचा बॉम्ब टाकला आहे. दंडाच्या 240 या किमान रकमेत वाढ करून ती 480 रुपये करण्यात आली आहे, तर जास्तीत जास्त 20 हजार रुपये असलेला दंड 50 हजार रुपये करण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. 

फेरीवाल्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे; मात्र किरकोळ दंड असल्याने कारवाई झाल्यानंतरही फेरीवाले वारंवार व्यवसाय करत असल्याचे लक्षात आल्याने पालिकेने फेरीवाल्यांचे कंबरडे मोडण्याचे ठरवले आहे. फेरीवाल्यांकडून फक्त दंड वसूल करण्याचा उद्देश नाही तर त्यांच्या उपद्रवाला प्रतिबंध करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रणजित ढाकणे यांनी स्पष्ट केले. 

साहित्याचे वजन किंवा प्रकारानुसार घेण्यात येणाऱ्या जप्तीशुल्कातही वाढ करण्यात आली आहे. सामानाचे जप्तीशुल्क 300 रुपये असल्यास त्यावर एक हजार रुपये दंड वसूल केला जात होता. तो आता दोन हजार रुपये करण्यात आला आहे. म्हणजे जप्तीशुल्कानुसार वसूल करण्यात येणारा दंडही दुप्पट करण्यात आला आहे. 

कॉंग्रेसचा विरोध 
फेरीवाला धोरण लागू न करता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे महापालिका सर्रास उल्लंघन करत आहे. त्यातच महासभेची परवानगी न घेता दंड वाढविण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे. या निर्णयाला विरोध करू, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. 

जप्ती शुल्क 
सामान .................................... पूर्वीचा.... आताचा 
- 10 किलोपर्यंत फळे, भाजीसाठी - 240 -480 रुपये 
- उसाचे चरक, कुल्फी, आइस्क्रीम हातगाडी - 20 हजार --.. 40 हजार (10 हजार अतिरिक्त) 
- शाहाळी - प्रत्येकी 10 रुपये..................... 20 रुपये 
- दुचाकीवरून वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्री - 1200 रुपये...... 2400 
- लोखंडी स्टॉल्स- 10 हजार रुपये - 20 हजार रुपये