महापालिका रुग्णालयांतील बाळंतिणींना मिळणार भेट! 

File photo of BMC
File photo of BMC

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांत प्रसूत होणाऱ्या महिलांना यापुढे मच्छरदाणी, कपड्यांचा संच आणि नॅपकिन देण्याबरोबरच एक हजार 200 रुपये देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. याविषयीचा प्रस्ताव लवकरच तयार केला जाण्याची शक्‍यता आहे. 

या मातांना रुग्णालयातून घरी पाठवताना मच्छरदाणी, नॅपकिन, तेल आणि साबण भेट द्यावा, असा ठराव महासभेने तीन वर्षांपूर्वी केला होता. भाजपच्या समिता कांबळे यांच्या मागणीनुसार हा ठराव मंजूर करण्यात आला होता; मात्र प्रशासनाने या वस्तू देण्यास नकार दिला होता. 2016 मध्ये या ठरावावर आरोग्य समितीत पुन्हा चर्चा झाली. त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांनी या भेट वस्तू देण्याबरोबरच राज्य सरकारच्या जननी शिशू सुरक्षा योजनेनुसार महिलांना देण्यात येणाऱ्या 600 रुपयांच्या भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली.

पालिकेच्या रुग्णालयांत प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरातील असतात. तिथे डासांचा त्रास असल्याने त्यांना मच्छरदाणी दिलीच पाहिजे, अशी भूमिकाही सदस्यांनी मांडली. 

सदस्यांच्या या मागणीनुसार प्रशासनाने आरोग्य समितीत सुधार अहवाल मांडला आहे. त्यात राज्य सरकारच्या 600 रुपयांबरोबर पालिकेकडून अतिरिक्त 600 रुपये देण्याचा विचार प्रशासन करत आहे. प्रसूत होणाऱ्या मातांना मच्छरदाणी, कपड्यांचा एक संच आणि नॅपकिन भेट देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com