मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अडीच तास ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

बदलापूर : मध्य रेल्वेवरील वांगणी ते शेलू स्थानकादरम्यान सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. या घटनेने ऐन भाऊबीजेच्या दिवशी कुटुंबासह निघालेल्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. 

वांगणी ते शेलू स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याचे रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने वाहतूक थांबविण्यात आली. परिणामी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कर्जतकडे जाणाऱ्या दोन लोकल बदलापूर स्थानकात रद्द करण्यात आल्या, तर बदलापूरहून निघालेली एक लोकल वांगणी स्थानकात रद्द करण्यात आली.

या काळात कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू होत्या. या काळात बदलापूरमधून एकही लोकल सुटली नाही. त्यामुळे बदलापूर रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. ऐन भाऊबीजेच्या दिवशी कुटुंबांसह निघालेल्या हजारो नागरिकांचे हाल झाले. अखेर सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी बदलापूरहून मुंबईच्या दिशेने लोकल सोडण्यात आली; मात्र सर्व गाड्या किमान अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे गाड्यांमध्ये खच्चून गर्दी झाली होती. 

मुंबईकडे गाड्या सुरू असतानाच कर्जतच्या दिशेने जाण्यासाठी गाड्या बंद होत्या. अखेर सुमारे अडीच तासांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे कर्जत व पुण्याकडे निघालेल्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. त्यांना गाड्या सुरू होण्याची वाट पाहत स्थानकातच तिष्ठत बसावे लागले, तर मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यातच गाड्या खच्चून भरल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे रूळ बदलण्यासाठी वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे सुमारे अर्धा तास गाड्या उशिराने धावत होत्या. 
- जे. झा, स्टेशन व्यवस्थापक, बदलापूर