मुंबई परिसरात थंडीचा कडाका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

मुंबई : दोन दिवसांपासून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गुरुवारी मुंबईचा पारा तीन अंशांनी घसरला. पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा 15.8 अंश सेल्सिअसवर आल्याने मुंबईत थंडी दाखल झाल्याचे वेधशाळा अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या ऋतुमानात पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा 15 अंशांवर आल्याने सकाळी स्वेटर घालूनच नोकरदारांना प्रवास करावा लागला. 

ओखी वादळाच्या प्रभावामुळे यंदा थंडीचे आगमन लांबले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीच्या आगमनाची चाहूल लागते. त्यानंतर गुलाबी थंडी दाखल होते. मात्र ओखीच्या मुंबई किनारपट्टीवरील प्रवेशामुळे थंडी वाहून नेणारे उत्तर दिशेने वाहणारे वारे रोखले गेले होते. या वाऱ्यांचा प्रभाव पुण्यापर्यंत जाणवला होता; परंतु ओखीच्या बाष्पाच्या प्रभावाने वाऱ्यांना पुढे सरकण्यास वाव मिळाला नाही. कमाल आणि किमान तापमानातही चढ-उतार होत होता. 

केंद्रीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कोकण पट्ट्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप अपेक्षित घट दिसून आलेली नाही. थंडीसाठी राज्यभरात पोषक वातावरण निर्माण झाले असून, लवकरच गुलाबी थंडी राज्यभरात जाणवेल, असा अंदाज वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: marathi news marathi websites mumbai news mumbai winter